Friday 9 March 2018

क्रिकेटची वाढती लोकप्रियता

https://drgokulsinghcommentator.wordpress.com/2018/03/08/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af/

Wednesday 20 December 2017

An extraordinary innings by JAYCOOL G .GIRASE & AAKASH SINGH from K.C.Gandhi school Kalyan

https://drgokulsinghcommentator.wordpress.com/2017/12/19/%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%b5-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%85%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f/

Friday 15 December 2017

गाईल्स शिल्ड स्पर्धेतील सामन्यात दादरच्या डाॅ.अॅन्टोनियो डा सिल्वा शालेय संघाचा विजय.

***दादरच्या डाॅ.अॅन्टोनियो डा सिल्वा शाळेचा दणदणीत विजय ***                  मुंबई क्रिकेट वर्तुळात नामांकित मानली जाणारी 14 वर्षाआतील मुलांसाठीची  गाईल्स शिल्ड  ही स्पर्धा मुंबईत खेळविली जात आहे. या स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात दादरच्या डाॅ.अॅन्टोनियो डा सिल्वा संघाने  गोकुलधाम शालेय संघाचा दारुण  पराभव केला.                                                             

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डाॅ. अॅन्टोनियो  डा सिल्वा  शाळेच्या संघाने   9 बळींच्या मोबदल्यात 176 धावा केल्या. त्यात वंश देवेंद्रच्या सर्वाधिक  52 धावा ,यज्ञेश जाधवच्या 41 धावा तर ओम कंठकच्या 20 धावांचा समावेश होता.गोकुलधाम शालेय संघाकडून खुष जैनने उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्याने 49 धावांच्या मोबदल्यात 7 बळी टिपले.रोनित ठाकूर व  विनित यांना प्रत्येकी 1 बळी टिपण्यात यश आलं.    
        गोकुलधाम शालेय संघाने सर्वबाद 88 धावा काढल्या. डाॅ.अॅन्टोनियो डा सिल्वा शालेय संघाचा 88 धावांनी मोठा विजय झाला. डाॅ.अॅन्टोनियो डा सिल्वा शालेय संघाकडून यज्ञेश जाधव ने नेत्रदीपक कामगिरी बजावली. यज्ञेशला गोलंदाजी दरम्यान 10 षटकात  2 निर्धाव टाकत 20 धावा देऊन 4 बळी  टिपण्यात यश मिळाले. गोलंदाजी दरम्यान लिखित  कदमने 28 धावा देऊन 3 बळी टिपले तर ऊतेकरला 1 बळी टिपण्यात यश मिळाले .                              
              डाॅ.अॅन्टोनियो डा सिल्वा शालेय संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीची सर्व स्तरांवर चर्चा सुरू आहे. तसेच या संघावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात नक्कीच हा संघ मोठ्या मोठ्या संघांना एक आव्हान ठरणार यात काही शंकाच नाही ! शाळेकडून सर्व खेळाडूंना नियमित चांगले मार्गदर्शन मिळत असते.शालेय संघाचे प्रशिक्षक अमोल जाधव यांचा देखील या विजयात सिंहाचा वाटा आहे.
------------------------------डाॅ.गोकुलसिंह गिरासे  (विश्वचषक 2011 स्पर्धेतील अंतिम सामन्याचे क्रिकेट समालोचक  आकाशवाणी मुंबई साठी).     E-mail. worldcupfinalcommentator @gmail.com

Wednesday 29 November 2017

कल्याणच्या डाॅक्टरांचा अनोखा उपक्रम

     सध्याच्या धावपळीच्या युगात अनेक लोकांना वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेले आहे. तरूण वर्ग देखील यात मागे नाही.अनेक तरूण-तरूणी व्यसनाच्या आहारी जातांना दिसत आहेत. अनेक ठिकाणी या विविध आजारांवर इलाज उपलब्ध असल्याचे आपण ऐकत असतो. परंतु "प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर "या उक्तीला अनुसरून कल्याण मधील काही डाॅक्टरांनी थोडेसे वेगळे पाऊल उचलले आहे. व्यसनापासून आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा व्यसनापासून नविन पिढीतील लोकांना लांब कस ठेवता येईल ?  या गोष्टीचा अभ्यास करून या डाॅक्टरांनी त्यासाठी पाऊल उचलले आहे.
          भारतासारख्या विकसनशील देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आजार थैमान घालत आहेत.असे आजार व कर्करोग सारख्या आजारांमुळे दररोज 2500 लोकांचा बळी जातो. तंबाखू  व धुम्रपानाची सवय तारूण्याच्या सुरूवातीच्या काळात लागत असते.दिवसेंदिवस तरूण युवा पिढी नशेच्या विळख्यात अडकतांना दिसत आहे.त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी हे घातक ठरत आहे. युवा पिढीच्या आरोग्यावरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबातील लोकांवर या आजारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने परिणाम होताना दिसत आहे.म्हणूनच शालेय जीवनात विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम व त्यापासून होणारे कर्करोगासारखे आजार या गोष्टींची माहिती व प्रशिक्षण देऊन जागृती केली तर युवा पिढीला या विळख्यात  जाण्यापासून परावृत्त करण्याचा मानस  कल्याणच्या या  डाॅक्टरांनी केला आहे.
              कल्याण मधील या डाॅक्टरांनी पुढाकार घेऊन विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जागृती आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. असे कार्यक्रम गेल्या तीन महीन्यांपासून विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राबविण्यात येत आहेत.तसेच अनेक ठिकाणी या कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  या अनुषंगाने नुकताच कल्याण पूर्वेतील कैलासनगर येथील विश्वास विद्यालय या ठिकाणी सदरचे प्रशिक्षण पार पडले. त्यात 120 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. या अनमोल मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी कल्याण मधील सुप्रसिद्ध कान ,नाक,घसा तज्ञ डाॅ.चंद्रकांत शेवाळे, होमिओपॅथिक तज्ञ डाॅ.यशवंत सावळे व डाॅ.विद्याधर गांगण तसेच सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डाॅ.सुदर्शन पाटील हे उपस्थित होते.  अशा सामाजिक कार्यात जास्तीत जास्त डाॅक्टरांनी सहभागी होण्याचे आवाहन डाॅ.चंद्रकांत शेवाळे यांनी केले. त्यांच्या या अथक परिश्रमाला माझा प्रणाम. तसेच त्यांच्या या व अशा सामाजिक सर्वच उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा.
-------------------------------द्वारा डाॅ.गोकुलसिंह गिरासे. ( क्रिकेट विश्वचषक 2011 च्या अंतिम सामन्याचे समालोचक ).
E-mail worldcupfinalcommentator@gmail.com
########################